पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ,यांच्याशी रोम येथील जी.20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट
Posted On:
31 OCT 2021 9:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ,यांची दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी रोम येथील जी.20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट झाली.
या दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांतील वाढत्या द्विपक्षीय व्यापाराचे आणि गुंतवणूकविषयक संबंधांचे, स्वागत केले,ज्यात अलीकडेच एअरबस स्पेनकडून छप्पन C 295 विमाने खरेदी करण्याच्या करारावर केलेल्या स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्यापैकी 40 विमाने टाटा ॲडव्हान्स सिस्टिम्सच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात येणार आहेत. त्यांनी ई-मोबिलिटी, क्लीन टेक, प्रगत साहित्य आणि खोल समुद्रातील अन्वेषण यासारख्या नवीन क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा आणखी विस्तार करण्याचेही यावेळी मान्य केले. पंतप्रधान मोदींनी स्पेनला ग्रीन हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि संरक्षण उत्पादन यासह विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आणि भारताच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन, मालमत्ता मुद्रीकरण योजना आणि गती शक्ती योजनेचा लाभ घेण्यास सांगितले.
दोन्ही नेत्यांनी आगामी सीओपी 26 (COP26) मध्ये भारत-युरोपीय महासंघाचे संबंध वाढविणे तसेच हवामान बदल संदर्भात कृती करणे आणि प्राधान्यांने सहकार्य करणे यावर चर्चा केली. अफगाणिस्तान आणि इंडो-पॅसिफिकसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
पंतप्रधान मोदी पुढील वर्षी पंतप्रधान सांचेझ यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहेत.
***
S.Patil/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768689)
Visitor Counter : 182
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam