पंतप्रधान कार्यालय
जम्मू आणि काश्मीरमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत केली मंजूर
Posted On:
28 OCT 2021 12:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये डोडा येथील थात्री जवळ रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह मदतही मंजूर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथील थात्री जवळ झालेल्या रस्ते अपघातामुळे मी दु:खी झालो आहे. या दुःखद प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबांप्रती शोक संवेदना व्यक्त करतो.
जे लोक जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi
जम्मू आणि काश्मीरमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील.: पंतप्रधान @narendramodi"
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767135)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam