केंद्रीय लोकसेवा आयोग

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती /इतर मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची हेल्पलाईन

Posted On: 20 OCT 2021 4:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्टोबर 2021

 

देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनवर्षाच्या संस्मरणार्थ ‘आझादी का अमृतमहोत्सव’ हा सोहळा यंदा  साजरा करत आहे. या सोहळ्याचा भाग होण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलत केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक हेल्पलाईन (टोल फ्री क्रमांक 1800118711)  सुरू केली आहे. आयोगाच्या परिक्षांना वा भरतीला अर्ज करू इच्छिणाऱ्या वा केलेल्या अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय(OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), आणि ठळक दिव्यांगता असलेल्या व्यक्ती (PwBD)  या उमेदवारांसाठी ही हेल्पलाईन आहे.

या प्रवर्गातील उमेदवारांचे शंकासमाधान मैत्रीपूर्ण पद्धतीने करण्याच्या उद्देशाचा एक भाग म्हणून आयोगाने ही हेल्पलाईन सुरु केली आहे.  ही हेल्पलाईन सर्व कामाच्या दिवसांमध्ये कार्यालयीन वेळेत सुरू राहील. उपरोल्लेखित प्रवर्गातील उमेदवारांना आयोगाच्या कोणत्याही परिक्षेचा अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी, भरतीसंदर्भातील अडचणी, किंवा आयोगाच्या परिक्षा वा भरतीसंबधीची कोणत्याही बाबींशी संबधित शंकांसंदर्भात या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल.
 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1765176) Visitor Counter : 1431