आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 98.67 कोटी मात्रां टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 87 लाख मात्रांचे लसीकरण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.14%, मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासात 13,058 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

उपचाराधीन रुग्णांची संख्या (1,83,118) मार्च 2020 पासून सर्वात कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.36%) गेल्या 116 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 19 OCT 2021 9:36AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात 87,41,160 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 98.67  (98,67,69,411) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 97,44,653 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

  


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose

1,03,76,000

2nd Dose

90,91,443

 

FLWs

1st Dose

1,83,62,479

2nd Dose

1,55,61,415

 

Age Group 18-44 years

1st Dose

39,58,41,135

2nd Dose

11,40,66,397

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,84,48,531

2nd Dose

8,71,46,650

 

Over 60 years

1st Dose

10,60,88,795

2nd Dose

6,17,86,566

Total

98,67,69,411


गेल्या 24 तासांत 19,470 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,34,58,801 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.14% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

 

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 114 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 13,058 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 231 दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली असून सध्या ती 1,83,118 आहे, जी मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.54 % आहे.

​​​​​​

 

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,81,314 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 59.31 (59,31,06,188) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.36% असून गेल्या 116 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.11% असून गेले सलग 50 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 133 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

***

STupe/VGhode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1764854) Visitor Counter : 232