पंतप्रधान कार्यालय
सूरत इथल्या सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी भूमीपूजन
Posted On:
14 OCT 2021 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2021
गुजरातच्या सूरत इथल्या सौराष्ट्र पटेल सेवा समाजाने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे (मुलांचे वसतिगृह) भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजेच, 15 ऑक्टोबर रोजी, सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.
या वसतिगृहात 1500 विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. यात एक मोठे सभागृह आणि एक विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयही आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या वसतिगृहाचे बांधकाम,(मुलींचे वसतिगृह) पुढच्या वर्षी सुरु होणार असून, त्यात 500 मुलींच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते.
सौराष्ट्र पटेल सेवा समाजाविषयी माहिती
ही एक नोंदणीकृत विश्वस्त संस्था असून तिची स्थापना 1983 साली झाली आहे. या संस्थेचे मूळ उद्दिष्ट, दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणे हे आहे. ही संस्था, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करते. तसेच, स्वयंउद्यमशीलता आणि कौशल्य विकासासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते.
गुजरातचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763987)
Visitor Counter : 223
Read this release in:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada