कोळसा मंत्रालय
औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडील कोळसा पुरवठ्याची नोंद
2 दशलक्ष टनांहून जास्त कोळसा पुरवठा—प्रल्हाद जोशी
कोळसा पुरवठा अजून वाढवण्यासाठी प्रयत्नशील
Posted On:
13 OCT 2021 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2021
सर्व उपलब्ध स्रोतांकडून औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडे येणारा कोळसा पुरवठा वाढल्याबद्दल केंद्रीय कोळसा, खनिकर्म आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोल इंडिया लिमिटेडसह इतर स्रोतांकडून होणारा एकूण कोळसा पुरवठा काल दोन दशलक्ष टनांपेक्षा जास्त नोंदवल्याचा ट्विट संदेश कोळसा मंत्र्यांनी केला आहे. विद्युत उत्पादन केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा असावा म्हणून या केंद्राकडे अधिक कोळश्याचा पुरवठा व्हावा याची काळजी घेतली जाईल असेही जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763644)
Visitor Counter : 269