कोळसा मंत्रालय

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी एनएलसी इंडिया लिमिटेड


पुढील वर्षापासून 4 दशलक्ष टनांवरून वार्षिक 20 दशलक्ष टन करण्याचा प्रयत्न

Posted On: 13 OCT 2021 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑक्टोबर 2021

 

एनएलसी इंडिया लिमिटेड, या सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनीच्या ओदिशा येथील 20 एमटीपीए तालाबिरा II आणि III ओपन कास्ट माईनने पहिल्या पूर्ण वर्षाच्या परिचालनादरम्यान आतापर्यंत 2 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे.

एनएलसी इंडिया लिमिटेडने चालू वर्षात आधीच्या 4 दशलक्ष टन उद्दिष्टाऐवजी वार्षिक 6 दशलक्ष टन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि कोळशाची वाढती मागणी लक्षात घेऊन एनएलसी इंडिया लिमिटेड चालू वर्षात तालाबिरा खाणीचे कोळसा उत्पादन 10 दशलक्ष टन पर्यंत आणि पुढील वर्षापासून 20 दशलक्ष टन पर्यंत वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

उत्पादित कोळसा एनएलसीआयएलची उपकंपनी तुतीकोरिन इथल्या एनएलसी तमिळनाडू पॉवर लिमिटेडच्या 2 x 500 मेगावॅट वीज निर्मिती संयंत्रांकडे नेला जात आहे. ही सगळी  निर्माण होणारी वीज दक्षिणी राज्यांची गरज भागवत असून यात तामिळनाडूचा मुख्य हिस्सा (40%पेक्षा जास्त) आहे.

कोळसा मंत्रालयाने खनिज सवलत नियमांबाबत खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्यात अलीकडेच सुधारणा केल्यामुळे, एन्ड यूज संयंत्राची कोळशाची गरज भागवल्यानंतर अतिरिक्त कोळसा विक्री खाणींना करता येते. त्यानुसार अतिरिक्त कोळसा विकण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763642) Visitor Counter : 183