पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भारत रत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

Posted On: 11 OCT 2021 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्टोबर 2021


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“द्रष्टे महान लोकनेते भारत रत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन. आपल्या खेड्यांतील जनतेच्या विकासासाठी आणि कृषी उद्योजकांना सक्षम करण्याच्या कार्यासाठी  त्यांनी त्यांचे जीवन वाहिले. नानाजी यांच्या जन्मशताब्दी वर्षी, 2017 मध्ये मी केलेल्या भाषणाची पुढील लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. https://t.co/KeWUhBvnPt https://t.co/jVkaRo4e9F"

 

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762911) Visitor Counter : 177