पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकात घर कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक;


पीएमएनआरएफमधून पीडितांसाठी सानुग्रह मदतीला दिली मंजुरी

प्रविष्टि तिथि: 07 OCT 2021 1:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  ऑक्टोबर 2021

कर्नाटकात, बेळगाव येथे घर कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून सानुग्रह मदत द्यायला  पंतप्रधानांनी मंजुरी देखील दिली आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले:

कर्नाटकातील बेळगाव येथे घर कोसळून झालेली जीवितहानी अत्यंत दुःखदायक आहे.या दुःखद घडीला माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबीयांसोबत आहेत. या दुर्घटनेत बळी गेलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जवळच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल.

 

 M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1761748) आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam