आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 89.74 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 69.33 लाख मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.86%, मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासात 24,354 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या (2,73,889) एकूण रुग्णसंख्येच्या 0.81%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.68%) गेल्या 99 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 02 OCT 2021 9:42AM by PIB Mumbai

 

गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 69,33,838 मात्रा देण्यात आल्या आहेत त्यामुळे भारताने 89.74 (89,74,81,554) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 87,06,441 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

 

HCWs

1st Dose

1,03,73,287

2nd Dose

89,07,790

 

FLWs

1st Dose

1,83,54,007

2nd Dose

1,50,47,392

 

Age Group 18-44 years

1st Dose

36,35,39,734

2nd Dose

8,51,18,303

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,03,02,227

2nd Dose

7,75,18,029

 

Over 60 years

1st Dose

10,17,62,489

2nd Dose

5,65,58,296

Total

89,74,81,554

 

गेल्या 24 तासांत 25,455 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,30,68,599 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.86% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002WWVX.jpg

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 97 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 24,354 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003HGC8.jpg

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,73,889 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.81% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 197 दिवसातील निचांकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004O2ZW.jpg

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 14,29,258  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.19 (57,19,94,990) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.68% असून गेल्या 99 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.70% असून गेले सलग 33 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 116 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0059FMP.jpg

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760358) Visitor Counter : 265