ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

11,000 पेक्षा अधिक साठा धारकांनी केंद्र सरकारच्या पोर्टलवर डाळींचा साठा घोषित केला


20 सप्टेंबर 2021 पर्यंत 30,97,694.42 मे.टन डाळींचा साठा घोषित

डाळींच्या साठ्याचे डिजिटायझेशन वेगाने सुरु

Posted On: 30 SEP 2021 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  सप्टेंबर 2021

देशातील किमान 11635  साठा धारकांनी  केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर 20 सप्टेंबर 2021 पर्यंत 3097694.42 मे.टन डाळींचा साठा असल्याचे घोषित केले आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभाग 22 अत्यावश्यक खाद्यवस्तूंच्या किरकोळ आणि घाऊक किमतींवर लक्ष ठेवून आहे. विभागाने काळ्या बाजाराला आळा घालणे, निर्यातीवर मर्यादा आणि आयातीला प्रोत्साहन देऊन उपलब्धता वाढवणे,अतिरिक्त साठा तयार ठेवणेआणि  चढे दर नियंत्रणात आणण्यासाठी वेळेवर साठा जारी करणे यासारख्या विविध प्रभावी धोरणात्मक उपायांद्वारे हे साध्य केले जात आहे.

या संदर्भात खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या डाळींच्या साठ्याची  माहिती जाणून घेणे  अत्यावश्यक होते. म्हणूनच, केंद्रीय  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, पियुष  गोयल यांच्या मंजुरीनुसार  विभागाने स्टॉकिस्ट, मिलर्स, आयातदार आणि डीलर्स यांसारख्या विविध साठाधारकांना त्यांच्याकडे अमुक तारखेला असलेल्या साठ्याबाबत माहिती नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक पोर्टल सुरु केले

 https://fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलचा वापर कोणत्याही नागरिकाला करता येऊ  शकतो. ओटीपीद्वारे ईमेल आणि मोबाईलची पडताळणी केल्यानंतर साठाधारक  पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करू शकतात. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर, ते त्यांचे तपशील आणि भौगोलिक माहिती  त्यांच्या प्रोफाइलमध्ये सामायिक करतात आणि अमुक  तारखेला त्यांच्याकडे असलेल्या साठयातील   विविध प्रकारच्या डाळीचे तपशील टाकू शकतात.  जेव्हा-जेव्हा साठा कमी किंवा जास्त होतो तेव्हा त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करत  राहण्याची जबाबदारी साठेधारकांची असते.

ग्राहक व्यवहार विभाग राष्ट्रीय स्तरावर परिस्थितीवर देखरेख  ठेवतो. देशभरात कोणत्याही विशिष्ट डाळीची टंचाई आढळल्यास ते  संबंधितांच्या लक्षात आणून देतो  जेणेकरून सरकार तात्काळ आयात करून किंवा निर्यात प्रतिबंधित करून किंवा परिस्थितीनुसार अतिरिक्त साठ्यातून पुरवठा  सुनिश्चित करू शकेल.

 

 Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759662) Visitor Counter : 248