आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
निमच-रतलाम रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 1,095.88 कोटी रुपये असेल आणि त्याची वाढीव / प्रकल्पपूर्तीची किंमत 1,184.67 कोटी रुपये आहे.
पहिल्या वर्षापासून 5.67 दशलक्ष टन अतिरिक्त वार्षिक मालवाहतूक अपेक्षित आहे जी 11 व्या वर्षी 9.45 दशलक्ष टन प्रतिवर्ष होईल
Posted On:
29 SEP 2021 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने निमच-रतलाम रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 1,095.88 कोटी रुपये असेल आणि त्याची वाढीव / प्रकल्पपूर्तीची किंमत 1,184.67 कोटी रुपये आहे. दुहेरीकरण होणाऱ्या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 132.92 किमी आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल.
निमच-रतलाम विभागाची रेल्वेमार्ग वापराची क्षमता देखभालीसाठी बंद ठेवण्यासह 145.6% पर्यंत आहे. प्रकल्प मार्ग विभागाचा (देखभालीसाठी बंद काळाशिवाय) इष्टतम क्षमतेपेक्षा जास्त वापर झाला आहे. वाहतूक सिमेंट कंपन्यांच्या कॅप्टिव्ह पॉवर प्लांटसाठी मुख्य आवक मालवाहतूक कोळसा आहे. निमच - चित्तौड़गढ परिसरात सिमेंट दर्जाच्या चुनखडीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झाल्यामुळे नवीन सिमेंट उद्योग येत असल्याने या विभागावरील वाहतूक आणखी वाढेल.
निमच-रतलाम विभागाच्या दुहेरीकरणामुळे विभागाची क्षमता वाढेल. अशाप्रकारे, अधिक माल आणि प्रवासी गाड्या सुरु केल्या जाऊ शकतात. सिमेंट उद्योगांच्या सान्निध्यामुळे पहिल्या वर्षापासून 5.67 दशलक्ष टन अतिरिक्त वार्षिक मालवाहतूक अपेक्षित आहे जी 11 वर्षात 9.45 दशलक्ष टन प्रतिवर्ष होईल. हे सुलभ कनेक्टिव्हिटी प्रदान करेल तसेच प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात चांगला परिणाम देईल. उंचागढच्या किल्ल्यासह अनेक ऐतिहासिक स्थळे प्रकल्प क्षेत्रात वसलेली असल्याने या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759378)
Visitor Counter : 266
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam