कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळशाच्या विक्रीसाठी अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु

Posted On: 27 SEP 2021 6:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2021

 

कोळसा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या प्राधिकरणाने कोळशाच्या विक्रीसाठी देशातील 11 कोळसा खाणींच्या लिलावासाठी सीएम (एसपी) कायद्याअंतर्गतच्या 12 खाणींसाठी आणि एम एम डी आर कायद्याअंतर्गत  दोन खाणी) दुसरा प्रयत्न सुरु केला आहे. या 11 खाणींपैकी, सहा खाणींचे उत्खनन पूर्ण झाले असून पाच अंशतः उत्खनन करण्यात आल्या आहेत. या सर्व खाणींसाठी 25 मार्च रोजी लिलावांचा पहिला प्रयत्न करण्यात आला होता, ज्याला एकच बोली मिळाली होती.

ही लिलावप्रक्रिया ऑनलाईन असेल आणि अत्यंत पारदर्शक अशा दोन स्तरीय प्रक्रियेतून महसूल टक्केवारीतील वाट्यानुसार लिलाव होईल. लिलाव प्रक्रियेतील महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे- राष्ट्रीय कोळसा निर्देशांकाची सुरुवात, कोळसा उत्खननाचा पूर्वानुभव नसलेल्या कंपन्यांनाही बोली लावायची संधी, कोळशाच्या वापरासाठी पूर्ण लवचिकता, पेमेंटची उत्तम व्यवस्था, कार्यक्षमतेला सवलतीच्या माध्यमातून प्रोत्साहन इत्यादी.

निविदा कागदपत्रांची विक्री प्रक्रिया 27 सप्टेंबर 2021 पासून सुरु होईल. खाणी, लिलावाच्या अटी, कालावधी या सगळ्याची सविस्तर माहिती, एमएसटीसीचे संकेतस्थळ (https://www.mstcecommerce.com/auctionhome/coalblock/index.jsp) लिलाव प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758636) Visitor Counter : 177