पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियानो अमॉन यांची भेट
Posted On:
23 SEP 2021 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियानो अमॉन यांची आज भेट घेतली.
या भेटीत भारताच्या दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राने निर्माण केलेल्या गुंतवणूक संधींवर त्यांनी चर्चा केली. यामध्ये इलेक्ट्रोनिक डिझाईन व उत्पादनासाठी नुकत्याच आणलेल्या उत्पादनाधारित प्रोत्साहन योजनेवर तसेच सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवरही चर्चा झाली. भारतात नवी स्थानिक संशोधन परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या धोरणांवरही चर्चा झाली.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757459)
Visitor Counter : 204
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam