वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय येत्या 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान साजरा करणार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
वाणिज्य विभाग साजरा करणार वाणिज्य सप्ताह
Posted On:
19 SEP 2021 7:16PM by PIB Mumbai
पुरोगामी भारत आणि त्याच्या गौरवशाली इतिहासाचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी आणि या काळाच्या स्मरणार्थ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने `स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पुढील आठवड्यात विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
वाणिज्य विभागाच्या वतीने 20 ते 26 सप्टेंबर 2021 या काळात `वाणिज्य सप्ताह` (व्यापार आणि वाणिज्य सप्ताह) साजरा करण्यात येणार आहे. देशभरात अनेक कार्यक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत हा केंद्रस्थानी आहे, उदयोन्मुख आर्थिक शक्ती आणि हरित आणि स्वच्छ असे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून भारताची प्रतिमा दर्शविण्याबरोबरच `कृषीभूमीपासून परदेशी भूमीपर्यंत` आणि निर्यातदारांचे संमेलन, वाणिज्य उत्सव या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. देशातील सर्व 739 जिल्ह्यांमध्ये ही कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.
15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला ‘निर्यात केंद्र’ बनवण्याचे आवाहन केले होते, त्यावरून प्रेरित होऊन, केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निर्देशानुसार `एक जिल्हा एक उत्पादन` (ODOP) योजनेला सप्टेंबर 2020 मध्ये प्रारंभ करण्यात आला. ओडीओपी जिल्ह्याची खरी क्षमता ओळखणे, आर्थिक वाढीला चालना देणे आणि रोजगार आणि ग्रामीण उद्योजकता निर्माण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून पाहिले जाते, जे आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जात आहे.
24 ते 26 सप्टेंबर 2021 या काळात होणाऱ्या वाणिज्य उत्सवामध्ये, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयासह (DGFT) निर्यात आणि बाजार विकास सहाय्य (E & MDA) आणि संबंधित राज्य सरकार यांच्या वतीने 700 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये निर्यातदारांचे संमेलन / बैठका आयोजित करण्यात येणार आहेत, मोठ्या स्वरूपातील भव्य कार्यक्रम 100 जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा आयुक्त /जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निर्यात प्रोत्साहन समित्या (DEPCs) या संमेलन / बैठका आयोजित करण्यात प्रमुख्याने आघाडीवर असतील. यामध्ये स्थानिक निर्यातदार / उद्योजकांसाठी 2-3 तासांची एकत्रित अशा स्वरूपात काही सत्रे आयोजित केली जातील, ज्यामध्ये लीड बँक, स्थानिक निर्यात कक्ष / संघटना आणि निर्यात प्रमोशनल कौन्सिल (ईपीसी) सारख्या भागधारकांचा परदेशी व्यापार मुद्द्यांचा चर्चेमध्ये समावेश असेल.
महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश आदी राज्ये आपापल्या औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (DICDL), गुजरात, औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (AITL), महाराष्ट्र, डीएमआयसी इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिप ग्रेटर नॉइडा लिमिटेड (IITGNL), उत्तर प्रदेश, सीबीआयसी तुमकुरू इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड, कर्नाटक आणि एनआयसीडीआयटी कृष्णापट्टणम् इंडस्ट्रियल सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड, आंध्रप्रदेश आणि डीएमआयसी विक्रम उद्योगपुरी लिमिटेड (व्हीयूएल), मध्यप्रदेश यांच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत.
***
R.Aghor/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756288)
Visitor Counter : 299