पंतप्रधान कार्यालय
भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2021 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2021
भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी विजय रूपाणी यांचे देखील कौतुक केले. ते म्हणाले की पाच वर्षांच्या कार्यकाळात रूपाणी यांनी अनेक जन-स्नेही उपाययोजना हाती घेतल्या तसेच समाजाच्या सर्व थरांतील लोकांसाठी त्यांनी अथकपणे कार्य केले.
आपल्या ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
भूपेंद्र भाई यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्यांचे अनुकरणीय कार्य मी पाहिले आहे, मग ते भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतील असो की नागरी प्रशासन आणि समाज सेवा विषयक असो. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याच्या भरभराटीचा आलेख नक्कीच उंचावत राहील.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या 5 वर्षांच्या कालावधीत विजय रूपाणी यांनी अनेक जन-स्नेही कार्ये हाती घेतली आहेत. समाजाच्या सर्व थरांतील लोकांसाठी त्यांनी अथकपणे कार्य केले. आगामी काळात देखील जनतेच्या सेवेत योगदान देण्याची कार्य ते सुरु ठेवतील असा विश्वास मला वाटतो.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1754517)
आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam