PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
12 SEP 2021 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 12 सप्टेंबर 2021
- 73.82 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 28,591new cases in the last 24 hours
- Active cases account for 1.16% of total cases
- India's Active caseload stands at 3,84,921
- Recovery Rate currently at 97.51%
- 34,848 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,24,09,345
- Weekly Positivity Rate (2.17%) less than 3% for last 79 days
- Daily positivity rate (1.87%) less than 3% for last 13 days
- 54.18 crore Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात दिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या 72,86,883 मात्रांसह देशाच्या कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती वाढून एकूण 73.82 कोटी (73,82,07,378) मात्रांच्या पुढे गेली आहे. 75,25,766 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
HCWs
|
1st Dose
|
10363703
|
2nd Dose
|
8587937
|
FLWs
|
1st Dose
|
18336456
|
2nd Dose
|
13991469
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
296771856
|
2nd Dose
|
42838102
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
142908025
|
2nd Dose
|
62511101
|
Over 60 years
|
1st Dose
|
92721925
|
2nd Dose
|
49176804
|
Total
|
73,82,07,378
|
देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे
गेल्या 24 तासांत 34,848 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,24,09,345 झाली आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.51% झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 77 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 28,591नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,84,921 असून आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.16% आहे.
देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,30,125 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 54.18 कोटींहून अधिक (54,18,05,829) चाचण्या घेतल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.17% असून गेल्या 79 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.87% असून गेले सलग 13 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 96 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
- भारत सरकारद्वारे (विनामूल्य पुरवठा मार्गाने ) आणि थेट राज्यांकडून खरेदीच्या माध्यमातून केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या एकूण 72.21 कोटींहून अधिक (72,21,17,085) मात्रांचा पुरवठा केला आहे. आणखी सुमारे 57 लाखांहून अधिक (57,56,240) मात्रा पुरवठा होण्याच्या मार्गावर आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या 5.16 कोटींहून अधिक (5,16,66,835) मात्रा अजून शिल्लक असून लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
- कोविड -19 विरूद्धच्या भारताच्या लढ्यात एक उल्लेखनीय पाऊल म्हणून, कोविड -19 नमुन्यांच्या निदान चाचणीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अंतर्गत असलेल्या नागपूर स्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) विकसित केलेले, मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांद्वारे घेतलेल्या नमुन्यांची कोवीड चाचणी करणारे स्वदेशी 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' तंत्र हस्तांतरित केले आहे. सलाईन गार्गल आरटी-पीसीआर तंत्रज्ञान सोपे, जलद, किफायतशीर, रुग्णस्नेही आणि आरामदायी आहे; हे तंत्रज्ञान चाचणीचा अहवाल झटपट उपलब्ध करून देते आणि पायाभूत सुविधांची किमान आवश्यकता असलेले हे चाचणी तंत्र ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी सोयीस्कर आहे. सीएसआयआर-नीरीने सांगितले की, संस्थेने विकसित केलेल्या नवतंत्रज्ञानाचे,समाजाच्या सेवेसाठी 'राष्ट्रार्पण' करण्यात आले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई ) कडे विना- विशेष आधारावर हे तंत्र हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे खाजगी, सरकारी आणि विविध ग्रामीण विकास योजना आणि विभागांसह सर्व सक्षम उत्पादकांना या नवीन तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण करणे आणि परवाना मिळणे शक्य होईल.
Important Tweets
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754344)
Visitor Counter : 283