माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अनुराग सिंह ठाकूर यांनी बांग्लादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. हसन महमूद यांची भेट घेतली


“वंगबंधू ”चित्रपट जलदगतीने पूर्ण करण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांची सहमती, मार्च 2022 मध्ये चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होण्याची शक्यता

6 डिसेंबर, 2021 रोजी “मैत्री दिन” च्या निमित्ताने विशेष समारंभाच्या आयोजनाचा आराखडा तयार केला जाईल

Posted On: 07 SEP 2021 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बांग्लादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. हसन महमूद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि प्रसारण आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील दृढ संबंध तसेच लोकांमधील संबंध अधिक  मजबूत करण्यासाठी आणि उभय देशांमधील सॉफ्ट पॉवर इंटरफेसच्या संधींचा शोध घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी भेट  घेतली. डॉ हसन महमूद यांनी अनुराग सिंह ठाकूर यांचे परस्पर हित आणि सहकार्याच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे  आयोजन केल्याबद्दल आभार मानले. त्यांनी भारत सरकारने उचललेल्या सक्रिय  पावलांचे कौतुक केले आणि मार्च 2021 मधील  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला.

2. अनुराग ठाकूर यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित "वंगबंधू " चित्रपटाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले आणि बरेचसे चित्रीकरण  पूर्ण झाले आहे आणि कोविड परिस्थिती सामान्य असल्यास मार्च 2022 पर्यंत निर्मितीचे काम पूर्ण होईल  जेणेकरून मार्च, 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर  चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली.  .

3. "1971 मधील बांगलादेशचा मुक्ती संग्राम " या माहितीपट चित्रपटाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे पाठपुरावा करण्याबाबत देखील  सहमती झाली. डिजिटल मनोरंजन आणि परस्पर देवाणघेवाणीद्वारे एकमेकांच्या देशांच्या चित्रपट प्रदर्शित करण्याच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावरही चर्चा झाली.

4. दोन्ही मंत्र्यांनी 6 डिसेंबर, 2021 रोजी मैत्री दिन साजरा करण्याबाबत चर्चा केली ज्यासाठी परस्पर स्वीकृत कृती योजना तयार केली जाईल  आणि अमलात आणली जाईल. ठाकूर यांनी जानेवारी 2021 मध्ये आयोजित 51 व्या इफ्फीमध्ये  सक्रिय सहभागासाठी बांगलादेश सरकारचे आभार मानले आणि नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात होणाऱ्या 52 व्या इफ्फीमध्ये  पुन्हा सहभागी होण्याचे  आमंत्रण दिले. दोन्ही मंत्र्यांनी सांस्कृतिक आणि लोकांमधील संबंध.अधिक मजबूत करण्यासाठी  दोन्ही देशांमधील सहकार्याला पाठिंबा दिला.

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752818) Visitor Counter : 208