माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डॉ. एल. मुरुगन यांनी घेतली ,रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांची भेट,धारपूरम मार्गे इरोड ते पलानी या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची केली विनंती
Posted On:
07 SEP 2021 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची धारापूरम मार्गे इरोड ते पलानी या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली.
जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या विभागातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येथे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग असावा, ही धारापूरमच्या लोकांची मागणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे.
डॉ मुरुगन यांनी कांचीपूरम मार्गे वाराणसी ते रामेश्वरम पर्यंत नियमित एक्स्प्रेस ट्रेन थेट रेल्वेसेवा सुरू करण्याची विनंती देखील यावेळी केली. यामुळे वारसास्थळ असलेले कांचीपुरम हे शहर रामायण सर्किटशी जोडले जाऊन
देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल.
श्री. अश्विनी वैष्णव यांनी बैठकीदरम्यान दोन्ही विनंत्यांवर सविस्तर विचार केला आणि तामिळनाडूतील रेल्वेचे जाळे विकसित आणि सुधारित करण्यासाठी सर्व शक्य असलेली मदत करण्याचे आश्वासन दिले.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752803)
Visitor Counter : 191