आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात गेल्या 24 तासात 1 कोटी 13 लाखांपेक्षा अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 68 कोटी 90 लाख मात्रांचा टप्पा
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.88 %
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 31,222 नवे दैनंदिन रुग्ण
देशातील सध्या उपाचाराधीन रुग्णसंख्या (3,92,864) एकूण रुग्णांच्या 1.19 %
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.56 %) गेले 74 दिवस 3 % पेक्षा कमी
Posted On:
07 SEP 2021 9:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021
भारतातील कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण यश म्हणजे, काल 1 कोटी 13 लाखांपेक्षा अधिक कोविड – 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 11 दिवसांत तीनवेळा हा टप्पा गाठला गेला आहे.
आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 1,13,53,571 मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण मात्रांची संख्या 69 कोटी 90 लाख (69,90,62,776) वर पोहोचली आहे. एकूण 72,26,439 सत्रांच्या माध्यमातून या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –
HCWs
|
1st Dose
|
1,03,61,392
|
2nd Dose
|
85,01,490
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,31,433
|
2nd Dose
|
1,36,58,274
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
27,76,44,784
|
2nd Dose
|
3,59,16,927
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
13,80,26,694
|
2nd Dose
|
5,89,70,434
|
Over 60 years
|
1st Dose
|
9,03,51,520
|
2nd Dose
|
4,72,99,828
|
Total
|
69,90,62,7
|
कोविड – 19 लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
गेल्या 24 तासात 42,942 रुग्ण बरे झाल्यामुळे, महामारीच्या प्रारंभीपासून आतार्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,22,24,937 वर गेली आहे.
परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 % झाला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 72 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 31,222 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,92,864 असून ती एकूण बाधित रुग्णांच्या 1.19 % आहे.
देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करणे सुरू असून गेल्या 24 तासात 15,26,056 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने आतापर्यंत 53 कोटी 31 लाखांहून अधिक (53,31,89,348) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.56 % असून गेले 74 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.05 % पर्यंत घसरला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेले 8 दिवस 3 % पेक्षा कमी राहिला आहे आणि आता तो 92 दिवस 5 % पेक्षा कमी आहे.
***
UU/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752782)
Visitor Counter : 227