पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा ; माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2021 9:16AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली आहे.

ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले ;

 

``ज्यांनी नेहमीच तरुणांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करण्यात, त्यांना घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, अशा सर्व शिक्षक बांधवांना, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा. कोविड – 19 च्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास ज्या पद्धतीने चालू ठेवला आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि त्यांची विद्वत्ता आणि देशाप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतो. ``

***

MaheshC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1752250) आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam