युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पॅरालिम्पिक टोक्यो 2020 रौप्य पदक विजेता मरियप्पन टी आणि त्याचे प्रशिक्षक राजा बी यांचा सत्कार केला
Posted On:
04 SEP 2021 6:51PM by PIB Mumbai
ठळक वैशिष्ट्य
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील मरिअप्पनचे हे दुसरे पदक होते; रिओ 2016 मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे पॅरालिम्पिक टोक्यो 2020 रौप्य पदक विजेता मरियप्पन टी आणि त्याचे प्रशिक्षक राजा बी यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले, "मरियप्पन याने रिओ आणि आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान वाटतो. मी त्याचे अभिनंदन करतो आणि पॅरालिम्पिक मधील आपल्या सर्व खेळाडूंचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यानिमित्त अभिनंदन करतो. "
क्रीडा मंत्र्यांशी बोलताना मरियप्पन म्हणाला, " भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची माझी अपेक्षा होती, मात्र स्पर्धेच्या दिवशी प्रतिकूल हवामानामुळे मी ते स्वप्न साकार करू शकलो शकलो नाही. मला विश्वास आहे की पॅरिसमध्ये मी देशासाठी पुन्हा सुवर्णपदक जिंकेन."
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752071)
Visitor Counter : 263