उपराष्ट्रपती कार्यालय
भविष्यात कोणत्याही महामारीविरोधात लढा देण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी संशोधनाला गती देण्याचे उपराष्ट्रपतींनी केले आवाहन
डीआयपीएएएस मधले संशोधक आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद
Posted On:
30 AUG 2021 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2021
कोविड–19 महामारी विरोधातल्या लढ्यात, डीआयपीएएएस अर्थात संरक्षण शरीरशास्त्र आणि उपयोजित विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिक आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाची उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी प्रशंसा केली आहे.भविष्यात अशा महामारीविरोधात प्रभावी लढा देण्यासाठी संशोधनाला वेग देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. डीआयपीएएएस ही डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची प्रयोगशाळा आहे.
डीआयपीएएएस मधले सुमारे 25 वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांना उपराष्ट्रपतींनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी. सतीश रेड्डी त्यांच्यासमवेत होते.
या महामारीने आरोग्य विषयक अभूतपूर्व अशा समस्या निर्माण केल्या असून जगभरात,लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवरही मोठा परिणाम केला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि कोविड-19 वरचे उपचार आणि व्यवस्थापन यासाठी विविध स्वदेशी उत्पादने विकसित केल्याबद्दल त्यांनी या संस्थेची आणि डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांची प्रशंसा केली. SARS-CoV-2, हा नवा उत्परिवर्तित विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यातला धोका लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी दक्ष राहणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
कोविड-19 वरचे उपचार आणि व्यवस्थापन यासाठी डीआरडीओच्या प्रयोगशाळांनी विकसित केलेली विविध उत्पादने आणि उपकरणे याबद्दल डॉ सतीश रेड्डी यांनी उपराष्ट्रपतींना माहिती दिली. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञाना आमंत्रित करून संवाद साधल्याबद्दल त्यांनी उपराष्ट्रपतींचे आभार मानले.
डीआयपीएएएसचे संचालक डॉ राजीव वर्ष्णेय यावेळी उपस्थित होते.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750466)
Visitor Counter : 206