आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 63.43 कोटी मात्रांचा टप्पा


भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.51%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 42,909 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या(3,76,324) ही एकूण रुग्णांच्या 1.15 %

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.41%) गेले 66 दिवस 3% कमी

Posted On: 30 AUG 2021 10:05AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत भारताने गेल्या 24 तासात 31,14,696  मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत 63.43  कोटीपेक्षा जास्त मात्रा (63,43,81,358) दिल्या आहेत. एकूण 68,14,305 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

HCWs

1st Dose

1,03,57,456

2nd Dose

83,55,737

 

FLWs

1st Dose

1,83,19,387

2nd Dose

1,30,84,369

 

Age Group 18-44 years

1st Dose

24,41,76,113

2nd Dose

2,65,28,385

 

Age Group 45-59 years

1st Dose

12,93,88,782

2nd Dose

5,34,76,008

 

Over 60 years

1st Dose

8,62,64,550

2nd Dose

4,44,30,571

Total

63,43,81,358

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात  34,763 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,19,23,405 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  

कोरोनातून बरे होण्याचा दर 97.51 झाला आहे.

सलग  64  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात  42,909 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,76,324 आहे.उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.15 %   आहे.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,19,990  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत  52.01कोटीहून अधिक  (52,01,46,525) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.41% असून गेले 66 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 3.02% असून गेले  84  दिवस  5% पेक्षा कमी आहे.

***

UU/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750389) Visitor Counter : 233