माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2021 8:12PM by PIB Mumbai
बंगळुरु, 28 ऑगस्ट 2021
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षां निमित्त साजरा होत असलेल्या 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'चा एक भाग म्हणून उद्या दुपारी मैसूर येथील आकाशवाणी परिसरात, कर्नाटकच्या प्रादेशिक लोकसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित 3 दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री श्री. एल. मुरुगन यांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर मंत्री “नादालय” या आकाशवाणी, मैसूर येथील संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या छायाचित्रांचे दालनाला भेट देतील.
आकाशवाणीला भेट देण्यापूर्वी, ते सकाळी सुत्तूर मठाचे ए परम पूज्य जगद्गुरु डॉ. शिवरात्री राजेंद्र महास्वामीजी यांच्या 106 व्या जयंती उत्सवात भाग घेतील, त्यानंतर ते मैसूर येथील जेएसएस कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कम्युनिटी रेडिओ केंद्राचे उद्घाटन करतील.
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1749992)
आगंतुक पटल : 198