संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मिशन सागर - भारतीय नौदलाचे ऐरावत जहाज  वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी इंडोनेशियामधील जकार्ता येथे दाखल

Posted On: 24 AUG 2021 2:26AM by PIB Mumbai

 

इंडोनेशिया सरकारने कळवलेल्या वैद्यकीय सामुग्रीच्या आवश्यकतेनुसार 10 द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) कंटेनर पुरवण्यासाठी  भारतीय नौदलाचे आयएनएस ऐरावत हे लँडिंग शिप टँक  24 ऑगस्ट 2021 रोजी इंडोनेशियाच्या जकार्ता मधील तानजुंग प्रियोक बंदरात दाखल झाले आहे. वैद्यकीय सामग्री उतरवल्यानंतर  आणि सध्या सुरु असलेल्या मिशन सागरचा एक भाग म्हणून, आयएनएस ऐरावत या क्षेत्रातील इतर मित्र देशांना  वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी पुढचा प्रवास करेल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pic(1)T91D.jpeg 
 

आयएनएस ऐरावत, या  जहाजाला मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती मदतकार्यासाठी तैनात केले जाते आणि यापूर्वीच्या  हिंदी महासागरातील विविध मदत मोहिमांमध्ये आयएनएस ऐरावतचा सहभाग होता. यापूर्वी याच जहाजाने वैद्यकीय सहाय्य पाठवले होते आणि 24 जुलै 2021 रोजी इंडोनेशियाला 5 द्रवरूप वैद्यकीय  ऑक्सिजन (एलएमओ) कंटेनर (100 एमटी) आणि 300 ऑक्सिजन काँन्सेन्ट्रेटर्स पुरवले होते. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pic(3)6N4J.jpeg
 

भारत आणि इंडोनेशिया दरम्यान एक मजबूत सांस्कृतिक बंध आणि भागीदारी असून सुरक्षित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी  सागरी क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. दोन्ही नौदल द्विपक्षीय व्यायाम आणि समन्वित गस्त स्वरूपात  नियमित नौदल सराव देखील करतात.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1748512) Visitor Counter : 213