आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारतातील लसीकरणाने 58.25 कोटींचा टप्पा पार केला
                    
                    
                        
रोगमुक्ती दर 97.63%; मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर
गेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळले.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,33,924 असून  गेल्या 155 दिवसांतील सर्वात नीचांकी पातळीवर 
कोविड सक्रिय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.03%, मार्च 2020 पासूनच्या सर्वात नीचांकी पातळीवर
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%), गेल्या मार्चपासून सलग 28 दिवस 3% पेक्षा कमी
                    
                
                
                    Posted On:
                23 AUG 2021 2:22PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2021
 
आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण आता 58.25 कोटींचा (58,25,49,595) टप्पा पार करत आहे. यासाठी 64,69,222 सत्रे आयोजित करण्यात आली होती.
आज सकाळी 8 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीचा ताळेबंद पुढीलप्रमाणे आहे:
	
		
			| HCWs | 1st Dose | 1,03,53,405 | 
		
			| 2nd Dose | 82,15,000 | 
		
			| FLWs | 1st Dose | 1,83,04,397 | 
		
			| 2nd Dose | 1,25,74,264 | 
		
			| Age Group 18-44 years | 1st Dose | 21,69,00,386 | 
		
			| 2nd Dose | 1,94,77,956 | 
		
			| Age Group 45-59 years | 1st Dose | 12,26,16,599 | 
		
			| 2nd Dose | 4,87,88,970 | 
		
			| Over 60 years | 1st Dose | 8,33,38,747 | 
		
			| 2nd Dose | 4,19,79,871 | 
		
			| Total | 58,25,49,595 | 
	
देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा आवाका व वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण रोगमुक्त झाले असून या महामारीची सुरुवात झाल्यापासून रोगमुक्त झालेल्यांची संख्या आता 3,16,80,626 झाली  आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर मार्च 2020 पासून सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजेच 97.63 % आला आहे. 

केंद्र सरकार तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त व अथक  प्रयत्नांमुळे नवे रुग्ण आढळण्याचा दैनंदिन दर गेले सलग 57 दिवसांमध्ये 50,000 पेक्षा खालीच राहिला आहे.
गेल्या 24 तासांत 25,072 नवीन रुग्ण आढळले, ही गेल्या 160 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे.

देशभरातील कोविड चाचण्यांची क्षमता सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 12,95,160 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने एकूण 50,75,51,399 चाचण्या केल्या आहेत.

चाचण्यांची क्षमता वाढवत असतानाच , साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर गेल्या 59 दिवसांतील सर्वात नीचांकी पातळीवर म्हणजे 1.91% पर्यंत आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 1.94% पर्यंत खाली आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेल्या 28 दिवसांत 3% च्या खालीच राहिला असून गेल्या सलग 77 दिवसांत तो 5% च्या खाली राहिला होता.

* * *
Jaydevi PS/U.Raikar/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1748221)
                Visitor Counter : 286
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam