पोलाद मंत्रालय
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या सेल-बीएसपीआणि सेल-व्हिआयएसएल प्रकल्पांद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन
Posted On:
19 AUG 2021 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2021
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या ‘सेल’ या महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगाने भिलई येथील प्रकल्पाच्या ठिकाणी ‘इंडिया@75’ या विषयावरील प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. एमटीटी2021 च्या तुकडीतील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थींनी या कार्यक्रमात भाग घेतला. ईडी (पी&ए) चे एस,के.दुबे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवत या प्रश्नमंजुषेचे उद्घाटन केले. या प्रश्नमंजुषेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेदरम्यान ‘इंडिया@75’ या विषयाबाबत विचारलेल्या रुचीपूर्ण आणि माहितीपर प्रश्नांची उत्तरे दिली.
भद्रावती येथील सेल- व्हिआयएसएल प्रकल्पातील व्हिआयएसएल मध्येही मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या समारंभाचा भाग म्हणून ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्यासाठी देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747442)
Visitor Counter : 301