गृह मंत्रालय

स्वातंत्र्यदिन, 2021 च्या निमित्ताने अग्निशामक दल, गृहरक्षक दल आणि नागरी सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

Posted On: 14 AUG 2021 12:32PM by PIB Mumbai

राष्ट्रपतींची शौर्य पदके आणि उल्लेखनीय सेवा पदकांबरोबरच शौर्य पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके अग्निशामक दल, नागरी संरक्षण आणि गृहरक्षकदलाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी दिली जातात. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अग्निशामक दलाच्या 86 कर्मचाऱ्यांना अग्निसेवा पदके देण्यात आली आहेत. यापैकी 26 जण त्यांनी दाखवलेले साहस आणि शौर्य यासाठी अग्निसेवा पदकांचे मानकरी ठरले आहेत. तर 10 कर्मचारी उल्लेखनीय सेवा पदकांचे आणि 50 कर्मचारी गुणवत्तापूर्ण सेवा पदकांचे मानकरी ठरले आहेत. त्याशिवाय गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाच्या 55 कर्मचाऱ्यांना गृहरक्षकदल आणि नागरी संरक्षण पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये उल्लेखनीय सेवेसाठी पाच आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 50 पदकांचा समावेश आहे.

अग्निसेवा पदके आणि गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांच्या मानकऱ्यांची यादी सोबतच्या परिशिष्टात समाविष्ट आहे.

***

NilimaC/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745730) Visitor Counter : 272