आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 53 कोटींचा मैलांचा टप्पा पार


गेल्या 24 तासात सुमारे 63 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर 97.45%

गेल्या 24 तासात 38,667 नव्या रुग्णांची नोंद

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या (3,87,673) सध्या एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 1.21%

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर (1.73%), गेल्या 19 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 14 AUG 2021 9:33AM by PIB Mumbai

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 53 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार  एकूण 60,88,437 सत्रांमध्ये, 53,61,89,903 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 63,80,937 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.  

यात समावेश आहे :

 

HCWs

1st Dose

1,03,46,330

2nd Dose

80,69,421

FLWs

1st Dose

1,82,67,067

2nd Dose

1,20,58,038

Age Group 18-44 years

1st Dose

19,16,49,945

2nd Dose

1,44,94,525

Age Group 45-59 years

1st Dose

11,59,91,624

2nd Dose

4,49,05,898

Over 60 years

1st Dose

8,05,91,149

2nd Dose

3,98,15,906

Total

53,61,89,903

 

 

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. 

भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45% वर पोहचला आहे.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,13,38,088 तर गेल्या 24 तासात 35,743 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत.  

भारतात गेल्या 24 तासात 38,667 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 48 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

 

भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 3,87,673 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.21% आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 22,29,798 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 49.17 (49,17,00,577) कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 2.05% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 1.73% आहे. गेल्या 19 दिवसांपासून हा 3% पेक्षा कमी तर सलग 68 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.

***

NilimaC/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745696) Visitor Counter : 246