शिक्षण मंत्रालय

भविष्यासाठी कार्यशक्ती निर्माण करण्याकरता शिक्षण आणि कौशल्य यात अधिक सुसूत्रता आणण्याचं काम सरकार करत आहे - केन्द्रीय शिक्षण मंत्री


उत्पादकता वाढवणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कौशल्य क्षमता बांधणी महत्वाची - श्री धर्मेन्द्र प्रधान

"रोजगार निर्मिती आणि उद्योजकता - रोजगार निर्मीतीचा भावी मार्ग" या विषयावरील सीआयआयच्या विशेष आभासी सत्राला केन्द्रीय शिक्षण मंत्र्यांनी केले मार्गदर्शन

Posted On: 12 AUG 2021 1:51PM by PIB Mumbai

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून भारताचे भविष्य आशादायी असल्याचेकेन्द्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेन्द्र प्रधान यांनी म्हटले आहे. ते आज सीआयआयच्या विशेष सत्रात रोजगार निर्मिती आणि उद्योजकता - रोजगार निर्मीतीचा भावी मार्ग"  या विषयावर आभासी माध्यमातून मार्गदर्शन करत होते. उत्पादकता वाढीसाठी तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता कौशल्य क्षमता बांधणी महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकविसाव्या शतकातील कौशल्याने आपली तरुण पिढी सुसज्ज असावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे श्री प्रधान यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) -2020 नुसारभविष्यासाठी कार्यशक्ती निर्माण करण्याकरता शिक्षण आणि कौशल्य यात अधिक सुसूत्रता आणण्याचं काम सरकार करत आहे असे केन्द्रीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

महामारीच्या काळात शैक्षणिक संस्थाकौशल्य विकास केन्द्रे यांना फटका बसला. मात्र सरकारने मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्य-आशय विकसित करुन शिक्षण सुरु राहील याची खातरजमा केलीयाकडे त्यांनी लक्ष वेधले.

नजीकच्या काळात प्रत्येक गाव अतिवेगवान इंटरनेटने जोडले जाईल. डिजिटायझेशनच्या या व्यापक प्रयत्नांनी नवी शिक्षणकौशल्य आणि उद्योजकता व्यवस्था उभारली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. अशावेळी भविष्यासाठी आपल्या युवकांना तयार करण्याकरता आपण मिळून काम करायला हवे. हेच युवक आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताचे नेतृत्व करणार आहेतअसे ते म्हणाले. या ध्येयानेच भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाढ होणार असूनतेच जागतिक विकासाचेही इंजीन ठरेल असा विश्वास श्री प्रधान यांनी व्यक्त केला. या मोहीमेसाठी उद्योगांनीही योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

डीसीएम श्रीराम लिमिटेडचे अध्यक्ष आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक श्री अजय श्रीरामसीआयआयचे महासंचालक श्री चंद्रजित बॅनर्जीप्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या  डॉ. गायत्री वासुदेवन आणि इतर उद्योग तज्ञ या सत्रात उपस्थित होते.

 

 ***

JaideviPS/V.Ghode/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745170) Visitor Counter : 254