संरक्षण मंत्रालय

रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धा-2021 मध्ये भारतीय सैन्य दलाचे पथक सहभागी होणार

Posted On: 09 AUG 2021 2:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021


रशिया येथे 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धा  - 2021 मध्ये भारतीय लष्कराचे 101 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे. हे पथक आर्मी स्काउट मास्टर्स स्पर्धा (एएसएमसी), एलब्रस रिंग, पोलर स्टार, स्निपर फ्रंटियर आणि सेफ रूट खेळांमध्ये उंचावरील प्रदेशात  विविध कवायती, बर्फातील खेळ , स्निपर क्रिया, विविध स्पर्धांमध्ये अडथळा असलेल्या प्रदेशात लढाऊ अभियांत्रिकी कौशल्ये दाखवतील. हे पथक ओपन वॉटर आणि फाल्कन हंटिंग गेम्ससाठी दोन निरीक्षक (प्रत्येकी एक) देखील पाठवणार आहे ,  ज्यात सहभागी संघ पोंटून ब्रिज लेईन्ग  आणि यूएव्ही क्रू कौशल्य दाखवतील.

भारतीय लष्कराच्या पथकाची त्रिस्तरीय चाचणीनंतर  विविध विभागांमधून  सर्वोत्कृष्ट निवड करण्यात आली आहे. या वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग  हे भारतीय सैन्याच्या व्यावसायिकतेचे  प्रतिबिंब आहे. स्पर्धेमुळे सहभागी राष्ट्रांच्या सर्वोत्तम पद्धतींच्या आधारे लष्करी सहकार्य देखील वृद्धिंगत होईल.  याआधी जैसलमेर येथे झालेल्या आर्मी स्काऊट्स मास्टर स्पर्धा 2019 मध्ये सहभागी झालेल्या आठ देशांमध्ये भारताने अव्वल स्थान प्राप्त केले होते.

 

* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1744009) Visitor Counter : 273