दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांनी माननीय चमनलाल यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे केले प्रकाशन


टपाल तिकीटाचे प्रकाशन हे "आझादी का अमृतमहोत्व" कार्यक्रमा अंतर्गत भारतातील अज्ञात नायकांचा गौरव करण्यासाठी टपाल विभागाच्या पुढाकाराचा एक भाग

Posted On: 07 AUG 2021 7:21PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांनी आज दिल्ली इथे एका सार्वजनिक कार्यक्रमात, माननीय चमनलाल यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. थोर समाजसेवक आणि संघप्रचारक मा. चमनलाल यांच्या जीवन तसेच कार्याला हे टपाल तिकीट उजाळा देणारे आहे.

चमनलाल यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोट इथे 1920 साली झाला. युवावस्थेपासूनच समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याच्या उत्साहाने ते भारलेले होते. शैक्षणिक जीवनात ते सुवर्णपदक विजेते होते, मोठमोठ्या नोकरीच्या संधी समोरुन येत होत्या पण फाळणीग्रस्तांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. चमनलाल हे खऱ्या अर्थाने भारतीय संत होते. आपल्याकडचे दुसऱ्याला देणे आणि त्यांची काळजी वाहणे यावर त्यांचा विश्वास होता. याच तत्वज्ञानाचा त्यांनी अंगिकार केला असे श्री नायडू म्हणाले.

संघाचे जागतिक पातळीवर जाळे तयार करण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. परदेशात जाणाऱ्या भारतीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी त्यांनी काम केले.

चमनलाल यांचा सर्व भारतीय वंशजांशी दृढ आणि अध्यात्मिक संबंध असल्याचे केन्द्रीय दळणवळण, रेल्वे, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 'आझादी का अमृतमहोत्व" अंतर्गत भारतातील विविध क्षेत्रामधल्या अज्ञात नायकांचा गौरव करण्याच्या टपाल विभागाच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

जंगलांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करण्याचे झपाटलेपण माननीय चमनलाल यांच्यात होते असे दळणवळण राज्यमंत्री श्री देवूसिंह चौहान म्हणाले.

आतंरराष्ट्रीय संस्कृती अभ्यास केन्द्राचे सरचिटणीस श्री अमरजीवा लोचन यांनी टपाल तिकीट प्रस्तावित केले तर श्री संखा समंता यांनी याचे आरेखन केले आहे.

या स्मरणार्थ टपाल तिकीट सर्व टपाल तिकीट विक्रीत्यांकडे उपलब्ध आहे. ऑनलाईन हवे असल्यास (Visit : https://www.epostoffice.gov.in/ ). इथे संपर्क करा.

***

Jaydevi PS/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743648) Visitor Counter : 361