वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग मंत्रालय उद्या सातवा राष्ट्रीय हातमाग दिवस करणार साजरा


राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळातर्फे आभासी ग्राहक-विक्रेता संमेलन

‘माय गव्ह’ पोर्टलवर विद्यार्थी आणि सामान्य लोकांसाठी हातमागाविषयीच्या प्रश्नमंजूषा स्पर्धेचे सात ते 11 ऑगस्ट आणि 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान आयोजन

Posted On: 06 AUG 2021 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय उद्या सातवा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहे. यानिमित्त देशातील विणकर, हातमाग कामगार समुदायाचा सन्मान केला जातो आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान अधोरेखित केले जाते. आपल्या हातमाग वारशाचे जतन करणे आणि हातमाग कामगारांना सक्षम करत त्यांना अधिक संधी मिळवून देण्यासाठीचा संकल्पही या दिवशी केला जातो. यंदा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने यानिमित्त, नवी दिल्लीत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, आणि वस्त्रोद्योग सचिव यू. पी. सिंग या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

स्वातंत्र्याच्या 75 अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आपल्या सर्वांना एक नागरिक  म्हणून भारतीय हातमागाची उत्पादने घेण्याचे आवाहन केले आहे. #MyHandloomMyPride या मोहिमेत सहभागी होऊन हातमाग कामगार आणि विणकरांनाप्रति आपली सौहार्द भावना दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेले हातमाग हे अत्यंत महत्वाचे क्षेत्र असून, अनेक ग्रामीण आणि निम-शहरी भागातील लोकांना रोजगार मिळवून देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा महिला सक्षमीकरणाशी थेट संबंध असून सर्व विणकर आणि संलग्न कामांमध्ये 70 टक्के संख्या महिलांची आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे स्वदेशी चळवळ. देशात सात ऑगस्ट 1905 रोजी ही स्वदेशी चळवळ सुरु झाली होती, त्याअंतर्गत, भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वदेशी भावना जागृत करण्यासाठी, चळवळ उभारली गेली. 2015 साली, केंद्र सरकारने सात ऑगस्ट हा दिवस दरवर्षी हातमाग दिवस म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नईत पहील्या राष्ट्रीय हातमान दिवसाचा शुभारंभ करण्यात आला होता.

सातव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त उद्या नवी दिल्लीत  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले उपक्रम

  1. कांचीपूरम येथे डिझाईन संसाधन केंद्राचे उद्घाटन
  2. विकास आयोग (हातमाग) द्वारे खालील ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या हातमाग गावांचे प्रदर्शन
    1. कोवलम ( जिल्हा तिरूअनंतपुरम, केरळ)
    2. मोहपरा (जिल्हा- गोलघाट, आसाम)
    3. कानिहामा (जिल्हा बडगाम, जम्मू काश्मीर)
  3. राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळातर्फे आभासी ग्राहक-विक्रेता संमेलन
  4. रायगड इथे बांधण्यात आलेल्या 'विणकर सेवा केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, सर्व विणकर सेवा केंद्रात, एनआयएफटी द्वारे  'डिझाईन संसाधन केंद्र' स्थापन केले जाणार आहेत. या केंद्रात, निर्यातदायर, उत्पादक, डिझाईनर्स, विणकर आणि इतर हितसंबंधी लोकांसाठी डिझाईन्सचा भव्य साठा उपलब्ध केला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, राष्ट्रीय पातळीवर- 'माय हँडलूम, माय प्राइड एक्सपो' या नावाने एक प्रदर्शन नवी दिल्लीत एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात, हातमाग उत्पादन कंपन्या आणि विणकरांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री सुरु आहे

महत्वाची हातमाग उत्पादक राज्ये आणि हातमाग विणकरांचे संपर्क क्रमांक खालील तक्ता क्र एक मध्ये दिले आहेत.

Andhra Pradesh

Kalamkari Handloom dress materials

· Bihar

Bhagalpuri tussar silk sarees & dress materials

· Karnataka

Ilkal silk sarees, bedsheet, dupatta

· Madhya Pradesh

Chanderi sarees, suit, dupatta

· Manipur

Manipur traditional H/L products

· Mizoram

Mizoram traditional H/L products

· Odisha

SambalpuriIikkat sarees, dress material

· Punjab

Phulkari

· Rajasthan

Cotton Bedsheet, Towel, Yogamat

· Uttar Pradesh

Banarasi sarees, suit, dress material

· WestBengal

Jamdani sarees, dress material, stoles

· Tamil Nadu

Salem sarees, dress material

· Telengana

Pochampally Ikat sarees, dress material

 

चौथी अखिल भारतीय हातमाग गणना (2019-20) तक्ता

No.

Parameters

4th Handloom Census

1

Number of Looms

28.20 lakh

2

Number of Households

31.44 lakh

3

Total number of Handloom Workers

35.22 lakh

a)

Total number of Weavers

26.74 lakh

b)

Total number of allied workers

8.48 lakh

5

Average no. of working days in a year by handloom worker

207

 

महत्वाची हातमाग उत्पादक राज्ये- तक्ता

No.

State

No. of Handloom Workers

1

Assam

12,83,881

2

West Bengal

6,31,447

3

Tamil Nadu

2,43,575

4

Manipur

2,24,684

5

Uttar Pradesh

1,90,957

6

Andhra Pradesh

1,77,447

7

Tripura

1,37,639

8

Odisha

1,17,836

9

Arunachal Pradesh

94,616

10

Karnataka

54,791

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743198) Visitor Counter : 364