युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने गेल्या तीन वर्षांत क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १८९ प्रकल्प , ३६० खेलो इंडिया केंद्रे, २४ खेलो इंडिया राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्रे आणि १६० खेलो इंडिया अकादमींना मंजुरी दिली : अनुराग सिंग ठाकूर
Posted On:
05 AUG 2021 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
ठळक वैशिष्ट्ये:
- युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने खेळांना उत्तेजन देण्यासाठी खेलो इंडिया योजना , राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार,पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडा कल्याण निधी,इ अनेक योजना तयार केल्या आहेत.
क्रीडा हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी सुयोग्य धोरण तयार करणे, ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तेजन देणे, इत्यादी जबाबदाऱ्या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे असतात. केंद्र सरकार या प्रयत्नांना हातभार लावत असते.
युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने क्रीडाक्षेत्राला व देशभरातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी खालीलप्रकारे योजना तयार केल्या आहेत :-
1 खेलो इंडिया योजना
2 राष्ट्रीय क्रीडा संघाला सहाय्य
3 आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना विशेष पुरस्कार
4 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, प्रतिभावान खेळाडूंना निवृत्तीवेतन,
5 पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडा कल्याण निधी
6 राष्ट्रीय क्रीडा विकास निधी
7 भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत (SAI)क्रीडा प्रशिक्षण केंद्रे चालवणे
युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण(SAI) च्या संकेतस्थळावर वरील सर्व योजनांची माहिती उपलब्ध आहे.
गेल्या तीन वर्षांत या मंत्रालयाने महाराष्ट्रासह देशभरात क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १८९ प्रकल्प , ३६० खेलो इंडिया केंद्रे, २४ खेलो इंडिया राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्रे आणि १६० खेलो इंडिया अकादमींना मंजुरी दिली आहे .
लोकसभेत आज एका लिखित उत्तरात केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.
Jaydevi PS/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742768)
Visitor Counter : 291