पंतप्रधान कार्यालय

महिला हॉकी संघ चिकाटीने खेळला आणि उत्कृष्ट कौशल्य दाखवले: पंतप्रधान

Posted On: 04 AUG 2021 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2021
 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, आज आणि संपूर्ण स्पर्धेत आपला महिला हॉकी संघ  धैर्य आणि चिकाटीने खेळला आणि टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले. ते असेही म्हणाले की, त्यांना संघाचा अभिमान आहे आणि संघाला आगामी सामन्यासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“टोकियो 2020 मधील आपण  ज्या गोष्टी लक्षात ठेवू  त्यापैकी एक म्हणजे आपल्या हॉकी संघांनी केलेली विलक्षण  कामगिरी. आज आणि संपूर्ण स्पर्धेत आपला महिला हॉकी संघ  धैर्य आणि चिकाटीने  खेळला आणि टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले.संघाचा अभिमान आहे.पुढील सामन्यासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. "

 

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742491) Visitor Counter : 163