पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या काही भागातील पूरस्थितीबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

Posted On: 04 AUG 2021 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राज्यातील काही भागात धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पाठींबा देण्याच्या हेतूने केंद्र सरकार शक्य असलेली सर्व मदत करेल अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिली.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधून राज्यातील काही भागात धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत चर्चा केली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पाठींबा देण्याच्या हेतूने केंद्र सरकार शक्य असलेली सर्व मदत करेल अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना दिली. पूरग्रस्त भागातील सर्वांची सुरक्षितता आणि स्वास्थ्य यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना केली आहे.”


 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742292) Visitor Counter : 228