पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार मध्य प्रदेश सरकारसोबत समन्वयाने काम करीत आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2021 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार मध्य प्रदेशच्या राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करीत आहे. पंतप्रधानांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
पंतप्रधान त्यांच्या ट्वीट संदेशात म्हणाले;
“केंद्र सरकार मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करीत आहे. मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोलून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्या भागातील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वास्थ्यासाठी मी प्रार्थना करत आहे.”
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742277)
आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam