माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतीय पॅनोरमा विभागात प्रवेशिका भरण्यासाठीची अंतिम तारीख जवळ येत आहे

Posted On: 27 JUL 2021 12:19PM by PIB Mumbai

भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ईफ्फी च्या भारतीय  पॅनोरमा या विभागात, चित्रपट कलेच्या प्रसारासाठी  सर्वोत्कृष्ट समकालीन भारतीय चित्रपटांची निवड केली जाते. 52 व्या ईफ्फी भारतीय पॅनोरमा 2021 विभागात  प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे त्यामुळे या विभागात प्रवेशिका भरण्याचे आवाहन ईफ्फीने पुन्हा एकदा केले आहे.

20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात होणार्‍या ईफ्फीसाठी 18 जुलै 2021 पासून प्रवेशिका स्वीकारण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे आणि इतर आवश्यक कागद्पत्रांसह ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी म्हणजेच संगणकीय माहितीची कागदपत्र प्राप्त करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे.


https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001E1K3.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002L682.jpg


2021 च्या भारतीय पॅनोरामा विभागासाठी चित्रपटाची प्रवेशिका दाखल करताना मार्गदर्शक तत्त्व पाळणे आवश्यक आहे. प्रवेशिका दाखल केलेल्या चित्रपटाची, निर्मिती पूर्ण झाल्याची तारीख किंवा सीबीएफसी म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरणाची तारीख महोत्सवापासून मागील 12 महिन्यांत म्हणजे 1 ऑगस्ट 2020 ते 31 जुलै 2021 पर्यंतची असावी. केंद्रीय चित्रपट प्रमाणिकरण मंडळाद्वारे प्रमाणित नसलेल्या आणि या कालावधीत निर्मिती झालेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका देखील दाखल करता येतील. सर्व चित्रपटांमध्ये इंग्रजी उपशीर्षके असणे आवश्यक आहे.

पार्श्वभूमी:

भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपट आणि भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचा प्रसार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून 1978 मध्ये भारतीय पॅनोरामा विभागाची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून वर्षभरातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी भारतीय पॅनोरामा पूर्णपणे समर्पित आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयांच्या, चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या भारतीय पॅनोरामाचे उद्दीष्ट म्हणजे कलात्मक, संकल्पनेवर आधारित आणि उच्च अभिरुचीची उत्कृष्टता असलेल्या कथा आणि कथाबाह्य चित्रपटांची निवड करून भारतीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय चित्रपट सप्ताह आणि सांस्कृतिक विनिमय शिष्टाचाराच्या माध्यमातून भारताबाहेर विशेष भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष आणि पॅनोरामा महोत्सवामध्ये या चित्रपटांच्या ना-नफा प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रपट कलेचा प्रसार करणे.

***

SonalT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739421) Visitor Counter : 262