रसायन आणि खते मंत्रालय

केंद्र सरकारने व्यापारी लाभावर मर्यादा घातल्याने 5 वैद्यकीय उपकरणांच्या 91% ब्रँडच्या दरांमध्ये 88% पर्यंत घट


पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन आणि नेब्युलायजरच्या किमतीमध्ये सर्वोच्च घट झाल्याची आयातदारांची माहिती

सुधारित कमाल किरकोळ दर 20 जुलै 2021 पासून लागू

Posted On: 24 JUL 2021 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय औषध दरनिश्चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) जनहिताच्या दृष्टीने आपल्या असाधारण अधिकारांचा वापर करत 13 जुलै 2021 रोजी एका अधिसूचनेद्वारे पाच वैद्यकीय उपकरणांच्या व्यापारी फायद्यांचे प्रमाण निर्धारित केले आहे.

ही उपकरणे आहेत:

  1. पल्स ऑक्सिमीटर,
  2. ब्लड प्रेशर मॉनिटरींग मशीन,
  3. नेब्युलायझर,
  4. डिजिटल थर्मामीटर आणि
  5. ग्लुकोमीटर.

वितरकाच्या पातळीवर दरांवरील लाभाची मर्यादा 70% करण्यात आली. या वैद्यकीय उपकरणांची एकूण  684 उत्पादने/ब्रँडस आणि 620 उत्पादने/ब्रँड्स  यांच्या दरात  23 जुलै 2021 रोजी कपातीची नोंद झाली.

पल्स ऑक्सिमीटर या उत्पादनाच्या दरात सर्वाधिक घट नोंदवली गेली. ती प्रति युनिट 2,95,375 पर्यंत होती. या दर कपातीचे तपशील खालील प्रमाणे आहेत.

Sl. No

 

 

Medical Devices

 

No of Brands Reported after the Notification

 

No of Brands reported Downward revision of MRP

 

Maximum Reduction Reported in MRP

 

 

 

 

Rs

Percentage

1A

Pulse Oximeter - Finger tip

136

127 (93%)

5,150

88%

1B

Pulse Oximeter - Others

73

62 (85%)

2,95,375

47%

 

2

Blood Pressure Monitoring Machine

 

216

 

195 (90%)

 

6,495

 

83%

3

Nebulizer

137

124 (91%)

15,175

77%

 

4

Digital Thermometer

 

88

 

80 (91%)

 

5,360

 

77%

5

Glucometer

34

32 (94%)

1,500

80%

 

Total

684

620 (91%)

 

 

आयात केलेल्या आणि स्थानिक ब्रँडसच्या किंमतीमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन आणि नेब्युलायझरच्या दरात सर्वोच्च कपात झाल्याची माहिती आयातदारांनी दिली आहे.

या सर्व उत्पादनांची 20 जुलै 2021 पासून लागू असलेली सुधारित कमाल किरकोळ किंमत या विषयीची माहिती राज्य औषध नियंत्रकांकडे अतिशय काटेकोर देखरेखीसाठी आणि  अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आली आहे.  या संदर्भातील निर्देश एनपीपीएच्या वेबसाईटवर (www.nppa.gov.in) उपलब्ध आहेत. उपलब्धतेवर देखरेख ठेवण्यासाठी वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक/ आयातदार यांना त्यांच्याकडील साठ्याचे त्रैमासिक तपशील कळवण्याचे निर्देश दिले आहेत. या महत्त्वाच्या निर्णयाला फिक्की, एडव्हामेड आणि ऐमचॅम यांसारख्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738599) Visitor Counter : 226