पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदतीची घोषणा

Posted On: 23 JUL 2021 6:43PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, "महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे अतिशय व्यथित झालो आहे. शोकाकुल परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात उदभवलेल्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष दिले जात असून बाधितांना मदत पुरवली जात आहे."

 

Anguished by the loss of lives due to a landslide in Raigad, Maharashtra. My condolences to the bereaved families. I wish the injured a speedy recovery.

The situation in Maharashtra due to heavy rains is being closely monitored and assistance is being provided to the affected.

— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2021

 

 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.

— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2021

 

या दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, "महाराष्ट्रात रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे."

 

PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who lost their lives due to a landslide in Raigad, Maharashtra. Rs. 50,000 would be given to the injured.

— PMO India (@PMOIndia) July 23, 2021

 

 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर @narendramodi यांची घोषणा

— PMO India (@PMOIndia) July 23, 2021

 

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738303) Visitor Counter : 192