अर्थ मंत्रालय
डिजिटल अणि शाश्वत व्यापार सुविधांबाबत संयुक्त राष्ट्राच्या जागतिक सर्वेक्षणात भारतीय कामगिरीच्या सुधारणेचे कौतुक
Posted On:
23 JUL 2021 12:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2021
संयुक्त राष्ट्राच्या आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने(UNESCAP) डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबत केलेल्या जागतिक सर्वेक्षणात भारताने 90.32% गुण मिळवले आहेत. भारताने या क्षेत्रात, 2019 साली 78.49% मिळवले होते, त्या तुलनेत, आता मिळवलेले गुण ही मोठीच झेप मानली जात आहे. हे सर्वेक्षण (https://www.untfsurvey.org/economy?id=IND) या संकेतस्थळावर बघता येईंल.
या, म्हणजेच 2021च्या सर्वेक्षणात एकूण 143 अर्थव्यवस्थांचे मुल्यांकन करण्यात आले. यातील पाचही निकषांमध्ये भारताने केलेल्या सुधारणेबद्दल सर्वेक्षणात भारताचे कौतुक करण्यात आले आहे. हे पाच निकष खालीलप्रमाणे :
- पारदर्शकता: 2021 मध्ये 100% (2019 साली 93.33% )
- औपचारिकता : 2021 मध्ये 95.83% (2019 साली 87.5%)
- संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य : 2021 साली 88.89% (2019 साली 66.67%)
- कागदविरहित व्यवहार : 2021 मध्ये 96.3% (2019 साली 81.48%)
- आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार : 2021 मध्ये 66.67% ( 2019 साली 55.56%)
दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम आशिया प्रदेशाशी (63.12%) तसेच आशिया प्रशांत-महासागर प्रदेशांशी (65.85%) तुलना करता, इथल्या देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वात उत्तम आहे, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. भारताची एकूण टक्केवारी, अनेक OECD देशांपेक्षाही म्हणजेच, फ्रांस, इंग्लंड, कॅनडा, नॉर्वे, फिनलंड पेक्षाही चांगली आहे. तसेच युरोपीय संघांपेक्षा भारताची सरासरी टक्केवारी उत्तम आहे. पारदर्शकतेच्या निकषात भारताने 100 टक्के तसेच व्यापार क्षेत्रात महिलांच्या टक्केवारीबाबत भारताने 66% मिळवले आहेत.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738039)
Visitor Counter : 267