शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या डिजिटल शिक्षणविषयक उपक्रमांचा घेतला आढावा
Posted On:
13 JUL 2021 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2021
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या पीएम ई-विद्या, राष्ट्रीय डिजिटल शिक्षण संरचना (NDEAR), स्वयम, यांच्यासह इतर डिजिटल शिक्षण विषयक उपक्रमांचा आढावा घेतला. राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग आणि राज्यमंत्री डॉ.सुभाष सरकार हे देखील या आढावा बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या या विविध उपक्रमांबाबत उपस्थित मंत्र्यांना माहिती दिली.
शिक्षण क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाचा लाभ करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करताना शिक्षणमंत्री प्रधान म्हणाले की, मुक्त, समावेशी आणि सुलभतेने प्राप्त होणाऱ्या शिक्षणाचे लक्ष्य गाठण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल.
शिक्षणक्षेत्रात चैतन्यपूर्ण डिजिटल परिसंस्थेच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींमध्ये वाढ होईल तसेच शिक्षण क्षेत्रात अभिनव संशोधन आणि उद्योजकतेला वाव मिळेल असे ते पुढे म्हणाले.
कोविड-19 महामारीमुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडविण्याची आणि डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याची गरज निर्माण झाली याकडे प्रधान यांनी लक्ष वेधले. तसेच देशातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरु राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेले उपक्रम यापुढेही अधिक सशक्त आणि संस्थागत केले जातील अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1735059)
Visitor Counter : 294
Read this release in:
English
,
Telugu
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam