कंपनी व्यवहार मंत्रालय

राव इंद्रजीत सिंग यांनी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणून स्वीकारला पदभार

Posted On: 12 JUL 2021 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

 

राव इंद्रजीत सिंग यांनी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणून आज पदभार स्वीकारला. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याआधी त्यांच्याकडे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र कार्यभार) आणि नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून आधीपासूनच कार्यभार  आहे.

सिंग हे हरियाणामधल्या गुरगाव लोकसभा मतदारसंघातुन 17 व्या लोकसभेत निवडून आले आहेत. खासदार म्हणून हा  त्यांचा  पाचवा कार्यकाळ आहे. 4 दशकाहून अधिक काळ जनसेवेत असणाऱ्या  सिंग यांनी हरियाणा मध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे. 

दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली असून  एलएलबीही याच विद्यापीठातून केले आहे. कृषी आणि वकीली पेशा असणारे 71 वर्षांचे सिंग हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

भारताच्या 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातले स्वातंत्र्य सेनानी राव तुला राम यांचे ते वंशज आहेत.  

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734774) Visitor Counter : 212