PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 08 JUL 2021 7:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 8 जुलै 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 36.48 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India reports 45,892 new cases in last 24 hours
  • India's Active Caseload currently at 4,60,704
  • Active cases constitute 1.50% of total cases
  • 2,98,43,825 Total Recoveries across the country so far
  • 44,291 patients recovered during last 24 hours
  • Recovery Rate increases to 97.18%
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.37%
  • Daily positivity rate at 2.42%, less than 3% for 17 consecutive days

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

Image

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

देशातील एकूण लसीकरण मोहिमेअंतर्गत 36.48 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडण्यात आला असल्याचे आज सकाळी सात वाजताच्या प्राथमिक आकडेवारीत निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 47,40,833 सत्रांतून 36,48,47,549 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 33,81,671 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड-19 लसी सार्वत्रिक मोफत उपलब्ध करून देण्याची मोहिम देशभर 21 जूनपासून सुरु झाली आहे. लसीकरणाची व्याप्ती आणि वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 45,892 नवे रुग्ण आढळले.

गेल्या 11 दिवसांपासून सातत्याने दैनंदिन रुग्णांची संख्या 50,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे. केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी समन्वय राखून सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

इतर अपडेटस्

 

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रात बुधवारी 9,558 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आणि  147 मृत्यूंची नोंद झाली जी कालच्यापेक्षा 24 ने कमी आहे. महाराष्ट्रात  61,22,893 संक्रमित रुग्ण असून  मृतांचा आकडा 1,23,857 आहे. गेल्या 24 तासात 8,899 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. आत्तापर्यंत 1,14,625 सक्रिय प्रकरणांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58,81,167 आहे.

 

गोवा अपडेट्‌स:-

गोव्यातील कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या बुधवारी 192 ने वाढली तर तीन मृत्यूंची नोंद झाली. यामुळे संक्रमित रुग्णांची संख्या 1,68,015 तर मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 3,082 झाली आहे. दिवसभरात 196 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले ज्यामुळे गोव्यात बरे होणाऱ्यांची संख्या 1,62,983 झाली आहे. तर 1,950 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.

Important Tweets

***

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733974) Visitor Counter : 203