आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 37.93 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे तसेच खाजगी रूग्णालयांकडे अद्याप 1.83 कोटी लसींच्या मात्रा शिल्लक
Posted On:
08 JUL 2021 4:44PM by PIB Mumbai
देशभर, कोविड-19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती आणि वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड-19 च्या लसी सर्वांना मोफत देण्याच्या मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. अधिकाधिक लसी उपलब्ध करत तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या उपलब्धतेची आगावू कल्पना देत लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. यातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणसाठी योग्य नियोजन करता येईल तसेच, लसपुरवठा साखळी अधिक सुनियोजित करणे शक्य झाले आहे.
देशव्यापी कोविड मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत लसपुरवठा करत या मोहिमेला आधार देत आहे. लसीकरण मोहिमेच्या या नव्या टप्प्यात, केंद्र सरकार 75 टक्के लसी खरेदी करुन, त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देणार आहे.
या अंतर्गत, विविध स्त्रोतांमार्फत, 37.93 कोटींपेक्षा अधिक लसी (37,93,56,790) आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. आणखी 23,80,000 लसींच्या मात्रा लवकरच दिल्या जाणार आहेत.
यापैकी, एकूण 36,09,69,128 लसींच्या मात्रा (वाया गेलेल्या लसींसकट) वापरण्यात आल्या आहेत. (सकाळी आठ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार) अद्याप, 1.83 कोटी (1,83,87,662) लसी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खाजगी रुग्णालयांकडे शिल्लक आहेत.
***
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733720)
Visitor Counter : 316