माहिती आणि प्रसारण मंत्रालय
नवनियुक्त मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2021 12:04PM by PIB Mumbai
अनुराग ठाकूर यानी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ठाकूर म्हणाले, की देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री या नात्याने प्रगतीचे हे अभियान पुढे नेण्याची त्यांची जबाबदारी आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या खांद्यावर टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, असे अनुराग ठाकूर म्हणाले. या वाटचालीत प्रसारमाध्यमांचे सहकार्य मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी अनुराग ठाकूर यांचे त्यांच्या दालनात स्वागत केले. त्यानंतर ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध कार्यालयांचे आणि प्रसारभारतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्व माध्यमप्रमुखांसोबत एक टीम म्हणून काम करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे ठाकूर यावेळी म्हणाले.



***
Jaydevi PS/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1733609)
आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam