महिला आणि बालविकास मंत्रालय
मानवी तस्करी (प्रतिबंध, काळजी आणि पुनर्वसन) विधेयक 2021च्या मसुद्यावर सूचना/हरकती पाठवण्याचे महिला आणि बालविकास मंत्रालयाचे आवाहन
Posted On:
04 JUL 2021 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2021
मानवी तस्करी (प्रतिबंध, काळजी आणि पुनर्वसन) विधेयक, 2021 बाबत सर्व संबंधित घटकांनी सूचना/हरकती पाठवाव्यात असे आवाहन, महिला आणि बालविकास मंत्रालयाने केले आहे. या विधेयकाचा उद्देश सर्वप्रकारची मानवी तस्करी रोखणे आणि त्यावर कठोर उपाययोजना करणे हा आहे. विशेषतः महिला आणि बालकांची तस्करी थांबवून, अशा पीडितांची योग्य काळजी घेणे, त्यांना संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. या पीडितांच्या नागरी अधिकारांचा सन्मान करून त्यांना नव्याने आयुष्य जगण्यासाठी, आवश्यक ती कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक मदत देण्याची व्यवस्था करणे, त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे ही उद्दिष्ट आहे. त्यासोबतच, असे गुन्हे करणाऱ्यांना चाप बसावा,यासाठी, अशा घटनांशी संबंधित व्यक्तींना कठोर शिक्षा करणे, देखील या विधेयकामुळे शक्य होईल. या विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर ते मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल आणि त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यावर, त्याचे कायद्यात रुपांतर होईल. सीमापार होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकेल.
उपरोक्त उल्लेखित विधेयकाच्या मसुद्यावर आपल्या सूचना/हरकती 14 जुलै 2021 पर्यंत पाठवायच्या आहेत. या सूचना/हरकती santanu.brajabasi[at]gov[dot]in या इमेलवर पाठवाव्यात.
विधेयकाचा मसुदा बघण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करावे
https://wcd.nic.in/acts/public-notice-and-draft-trafficking-persons-prevention-care-and-rehabilitation-bill-2021
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732639)
Visitor Counter : 1170