शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षणमंत्री उद्या निपुण (NIPUN) भारत या योजनेचा करणार शुभारंभ

Posted On: 04 JUL 2021 12:14PM by PIB Mumbai

केंद्रसरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, उद्या म्हणजेच दिनांक 5 जुलै 2021 रोजी समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन या साठी सुरू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय योजनेचा (NIPUN BHARAT)प्रारंभ करणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते द्रुकश्राव्य माध्यमाद्वारे या योजनेचा शुभारंभ होईल.

​​या कार्यक्रमा दरम्यान निपुण भारत( NIPUN BHARAT) योजनेची माहिती देणारी एक लघुचित्रफीत दाखविली जाणार असून , राष्ट्रगीत आणि या योजनेच्या अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्त्वे देखील समजावून सांगितली जाणार आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी,सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संस्था प्रमुखही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील.

'निपुण भारत'चा प्रारंभ म्हणजे दिनांक 29 जुलै, 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी करण्यासाठी योजलेल्या अनेक उपाययोजनांपैकी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे निपुण भारत मिशनचे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल. निपुण भारत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग राबविणार असून समग्र शिक्षा या नावाने या केंद्रसरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा स्तरावर या योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुरू करण्यात येईल. 

***

MC/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732606) Visitor Counter : 1531