पंतप्रधान कार्यालय
सिरमौर दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
सानुग्रह अनुदानाची केली घोषणा
Posted On:
28 JUN 2021 10:58PM by PIB Mumbai
हिमाचल प्रदेशातील सिरमौर इथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रती पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठीही त्यांनी प्रार्थना केली.
पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मृतांच्या नजीकच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची तर जखमीला 50 हजार रुपये मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमधे ही माहिती दिली आहे.
" हिमाचल प्रदेशातील सिरमौर इथे झालेल्या जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले. मृतांच्या कुटुंबियींप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. मृतांच्या नजीकच्या नातेवाईकाला PMNRF निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान तर जखमीली 50 हजार रुपयांची मदत निधी दिला जाईल : पंतप्रधान मोदी" असे ट्विटर संदेशात म्हटले आहे.
***
Jaidevi PS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731096)
Visitor Counter : 161
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam